SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

घटनेने उद्दिष्टे सांगितली आहेत, धोरण नव्हे.

घटनेने आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि परराष्ट्रीय उद्दिष्टे सांगितली आहेत, धोरण नव्हे.

अनेक पर्यायी धोरणातून जे निवडले गेले ते धोरण दुसऱ्पा पंचवार्षिक योजनेत मांडले गेले. हे धोरण लायसन परमिट राज निर्माण करील, यामुळे भ्रष्टाचार माजेल, या मार्गाने जाऊ नका असे सांगणारे अनेक अर्थतज्ञांचे सल्ले धुडकावून रशियाच्या धर्तीवर प्लांनिंग होत गेले. याबद्दल भरपूर लिखाण उपलब्ध आहे. गडबड इथेच झाली. रशियाची आणि जे जे देश या मार्गाने गेले त्यांची आजची परिस्थिती फारशी वेगळी नाही.

भारतातील गेल्या सत्तर वर्षातील निम्म्याहून अधिक आंदोलने भ्रष्टाचार विरोधातच घुटमळली आहेत. सत्तान्तरेही.

अण्णा हजारेंच्या आंदोलनात आम्ही म्हणत असुत कि डुकरे धुण्याचे काम बंद करून घाणीचा -भ्रष्टाचाराचा- उगम शोधा, त्यावर हल्ला करा. ती नाली जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत बरबटलेली डुकरे रोज तयार होणारच. आणि डुकरे धुण्याचे काम कित्येक पिढ्या चालेल. असेच झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *