SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

जलयुक्त शिवारची बंद पडलेली कामे

जलयुक्त शिवारची बंद पडलेली कामे नव्या सरकारच्या कारकिर्दीत नव्या निर्दोष योजनेत केव्हा सुरू होतील?

जलयुक्त शिवार सदोष होते, त्यात भ्रष्टाचार होता असे सांगुन कार्यवाही थांबवण्यात आली होती. सिंचन घोटाळ्यांचे काय झाले? गैरव्यवहार होतात, भ्रष्टाचार होतो म्हणून आपण काय काय थांबवणार आहोत? पोलिसखाते, महसूल, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम, पीडीएस, नगरपालिका, रुग्णालये, शिक्षण, हे सगळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार मुक्त आहेत काय? हे सगळे स्वच्छ असले पाहिजे हे तर आवश्यकच आहे. त्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करीत आहोत?

हा गंभीर विषय आहे. या अभियानातून दरवर्षी पांच हजार गावे दुष्काळ मुक्त केली जाणार होती. पावसाळा हातचा गेला आहे. या वर्षी अनेक धरणे अजूनही जेमतेम पाणी साठा करून आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी ही बदललेली नाही. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी अजून मोठे पाऊस झालेले नाहीत. पाणीसाठे फारच कमी आहेत.

करोना च्या काळात दोन कामे आवश्यक होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायची कामे शहरात जशी आवश्यक आहेत तसेच जलसाठे वाढवण्याच्या दृष्टीने तातडीची तसेच दीर्घकालीन उपाययोजनाही आवश्यक होत्या. त्यांच्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

याचे गंभीर परिणाम होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *