SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

चीन, तैवान आणि भारत

अलीकडे सीएनएन चे फरीद झकेरिया यांनी आपल्या एका लेखात हिल्टन यीप यांच्या लेखातील काही वाक्ये उधृत केली आहेत. सारांश असा. तैवानने अलीकडेच चीनमधून तैवानमध्ये परत येण्यासाठी तैवानी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षांची पुनर्वसन योजना सुरू केली आहे. चीनने यासाठी उद्योजकांना जमीन पुरवठा, कामगार आणि वीज , तसेच कर माफी आणि बँक कर्ज अनुदानावर देणारी ऑफर दिली. टेक, स्मार्ट मशीनरी, बायोमेडिसिन आणि ग्रीन एनर्जी सारख्या नाविन्यपूर्ण औद्योगिक क्षेत्रासाठी या योजना तैवानने आखल्या आहेत.

या धर्तीवर भारतात काही घडत आहे का असे विचार माझ्या मनात आले.

जगभर चीनवर अवलंबून असलेल्या उद्योगात करोनामुळे नव्या रचना होत आहेत. आपल्यालाही आपले उद्योग वाढावेत यासाठी आणि चीन मधून आपल्याकडे येऊ शकतात अशा उद्योगासाठी निमंत्रक देशांशी स्पर्धा करावी लागणार आहे. चिनी कच्चा माल, कार्यक्षम उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांमधील फारच कमी समस्या, अतिशय कमी भ्रष्टाचार, उच्च स्पर्धात्मकता, उत्पादकता देणारे कुशल कामगार, आधार देणाऱ्या बँका, त्वरित कायदा अंमलबजावणी आणि अमर्यादित गुंतवणूक या क्षेत्रात ती स्पर्धा असणार आहे. आम्ही हे सगळे कसे करणार आहोत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *