SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

कल्याणकारी कार्यक्रम, सरकारी मदत, आणि सूट सबसिडी


शेतकरी संघटनेची स्थापनेपासूनची सूट सबसिडी नाकारणारी आणि ‘घेऊ घामाचे दाम’ असे म्हणणारी घोषणा आहे. त्यावरून तुकाराम महाराजांचा अभंग आठवला :


माकडे मुठीसी धरिले फुटाणे । गुंतले ते नेणे हाथ तेथें ।।
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुले ते ।।
शुके नळीकेशी गोवियेले पाय । विसरोनी जाय पक्ष दोन्ही ।।
तुका म्हणे एक ऐसे पशु जीव । न चले उपाव काही तेथे ।।

अरुंद तोंड असलेल्या भांड्यातले फुटाणे घेण्यासाठी जेव्हा माकड हात घालते आणि हात बाहेर काढताना त्याची बंद मूठ भरलेली असल्याने हात बाहेर काढू शकत नाही. तसेच जेव्हा पोपट खाद्य खाण्यासाठी लांब नळीवर बसतो तेव्हा त्याच्या स्वतःच्याच वजनाने नळी उलटी फिरते. पडू नये यासाठी तो नळीला पकडून ठेवतो. उडून जावे हा विचार न करता तो विसरून जातो की त्याला दोन पंख आहेत. आता हा नेमका कोणाचा अन्याय म्हणावा? ज्याला आपल्या हिताचे कळत नाही तेथे काही उपाय चालत नाही.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *