SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

वेगाने अर्थव्यवस्थेचे खुलीकरणच शेतकर्‍यांची दैना संपवील

शेती करणे तसेच सोडणे फायद्याचे होण्यासाठी

शेती करणे तसेच सोडणे – दोन्ही व्यवहार शेतकऱ्याच्या फायद्याचे होण्यासाठी शेतीसाठी ईतर क्षेत्रातुनच गुन्तवणुक येणे आवश्यक आहे.

तसेच शेतीच्या आकारमानात वाढही व्हायला पाहिजे.

यासाठी या क्षेत्रातील सगळे अडथळे दूर केले पाहिजेत. शेती आणि शेतकरी विरोधी तीन प्रमुख कायदे समोर आहेत. आणखी अनेक आहेत. लढाई वाढणार आहे.

शेती करणार्‍यांचा इतर व्यवसायातील शिरकाव गेली शतकभर अत्यंत धीमा राहिल्याने सगळया विकसनशील देशात हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. त्यात वसाहतवादी आणि समाजवादी सरकारांचा कहर की त्यांनी हा नैसर्गिक बदल सहज आणि सम्रुद्धिसह घडण्यात प्रचंड अडथळे आणले. इतर क्षेत्रात वेगाने ताकदीची मनुष्यबळाची ओढ (pull) तयार झाली असती तर हा बदल सुखकर झाला असता. १९२१ सालीच शेतीतून माणसं बाहेर फेकली जात असल्याचे (push) बाबासाहेबांचे निरिक्षण होते. त्याना सामावुन घेत सुबत्तेची मार्गक्रमणा झाली नाही.

नागरीक, देशातील उद्योग आणि शेतकरी यांना स्वातंत्र्य नाकारुन सुबत्ता निर्माण होत नाही हे दाखवून देणे हा शरद जोशींच्या मांडणीचा गाभा होता. शेतकरी संघटनेची सर्व आन्दोलने लायसन परमिट व्यवस्था सम्पली पाहिजेत या साठी होती व आजही आहेत. जगातील सर्व समाजवादी अर्थव्यवस्थांनी सुबत्ता आणण्यासाठी समाजवाद सोडला आणि खुलीकरण स्विकारले. त्यालाही तीस वर्ष झाली. खुलीकरण नाकारणार्या सर्व देशात शेतकर्यासमोर क्षीण ओढ आणि जबरदस्त बाहेर फेकले जाण्याची समस्या आता ऊभी आहे.

अत्यंत कठोरपणे सर्व प्रयत्न आणि धोरण वेगाने आर्थिक वाढ कशी गाठणार आणि टिकवणार यावर ठेवली तरच हे शेतीबाहेर पडण थोडं कमी यातना देणारं ठरेल. जगभर हे घडतय. आपला प्रवास कसा राहील ते ठरवायची वेळ वेगाने निघुन जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *