SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण

शेतकऱ्यांचा संप सुरु झाल्यापासूनच त्याचे वेगळेपण लक्षात येऊ लागले तसे जाल-नोंदीच्या द्वारे आठ निरीक्षणे फेसबुक वर मांडली. ती सगळी एकत्र इथे मांडतो आहे. यावरून सुकाणू समिती आणि शासन एकूणच परिस्थिती समजून घेण्यात आणि संप हाताळण्यात कमी का पडले हे स्पष्ट व्हावे.


|| शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण || १ || १.६.२०१७  ५.१४ pm 

या संपाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवसंजीवनी देण्याची संधी मोदी / फडणवीस शासनाना मिळाली आहे. त्यास सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे.


|| शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण || २ || २.६.२०१७  २.०४ pm 

शेतकरी संप सरकारच्या विरोधात असूनही या संपात सरकारी / सार्वजनिक मालमत्तेचे (आत्तापर्यंत) कोणीही नुकसान केलेले नाही.


|| शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण || ३ || २.६.२०१७  ३.०६ pm

संपात सगळ्या जाती-धर्माचे शेतकरी सामील आहेत. असे जाती-धर्म यांच्या पलीकडे जाणारे अलीकडच्या काळातले हे पहिले आंदोलन आहे.


|| शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण || ४ || २.६.२०१७  ५.५२ pm 

संपात रस्त्यावर टाकलेल्या भाज्या, फळे, सांडलेले दूध हा काही अतिआग्रही किंवा उचापती संपकऱ्यांचा खेदजनक उत्साह आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी संपात सामील व्हावे या साठी हे झाले आहे हे उघड आहे. शेतकरी आपल्या शेजाऱ्याच्याही मालाची जपणूक करतो हे सगळ्यांनाच माहित आहे. तो या नासधुसीच्या विरोधात आहे.
आता संपावरील शेतकऱ्यांनी दुधाचा खवा करून ठेवण्याचे आणि भाजीपाला शेतातच राहू देण्याचे प्रकार गावोगावी होतांना दिसत आहेत.
मात्र अशा वस्तूंच्या एकूण व्यवहाराची व्याप्ती आणि आकार पाहता पहिल्या दिवशी झालेली ही नासधूस क्षुल्लकच म्हणावी लागेल


|| शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण || ५ || २.६.२०१७  ६.५९ pm 

“अन्नाची नासधूस कोणीही केली तरी वाईटच.”


|| शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण || ६ || ३.६.२०१७  ११.०८ pm

सत्ताधारी पक्षाचे अनेक समर्थक, सत्तेत सहभागी मित्रपक्ष आणि सर्व विरोधी पक्ष (एखादा दुसरा सोडून) आणि शेतकऱ्यांच्या संघटना यांची हा संप यशस्वी व्हावा अशी भावना आहे. त्यातील काही मागण्यासाठी शेतकरी दोन-तीन दशके लढताहेत. उशिरानेका होईना आता त्यांना सार्वत्रिक समर्थन मिळते आहे हे खरे. पण प्रत्येकाचे कारण वेगळे आहे.


|| शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण || ७ || ५.६.२०१७  ४.१८ pm

शेतमालाला रास्त भाव आणि कर्ज-वीजबिल मुक्ती या मागण्यासाठी शेतकरी दोन-तीन दशके लढताहेत. याबद्दलची तर्कशुद्ध मांडणी आणि शेतीचे अर्थशास्त्र पुनःपुन्हा सरकार आणि जनतेसमोर मांडली गेली आहे. तरीही आमचे नेते म्हणतात “अभ्यास चालू आहे ”


|| शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण || ८ || २.७.२०१७  १०.४४ pm

(६.६ रोजी लिहिले पण संपात फूट पडू नये म्हणून तेंव्हा प्रसिद्ध केले नव्हते.)सगळ्यात जास्त आत्महत्या जिथे होतात त्या विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी संपाचा जोर नाही. फारसे कर्जवाटपही झालेले नाही. मराठवाड्यात आणि विदर्भात रास्त भावाचा मुद्दा तूर, सोयाबीन, कापसामुळे शेतकऱ्यांना महत्वाचा वाटतो. त्याबद्दल संपात कोणी फारसे बोलत नाहीत. उलट अतिशय कमी आत्महत्या होतात त्या पश्चिम महाराष्ट्रात कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर आहे, कर्जमाफीचा मुद्दा जोर धरून आहे. म्हणून या संपात कर्जमाफी आणि रास्त भाव हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *