SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

शेतकऱ्यांना हिशेब पाहिजे- दान, माफी नको,

नुकसान भरपाई आहे की अनुकंपा मदत की लूट वापसी की आणखी काही

मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटायची घोषणा केली आहे. ही लूट वापसी मधली रक्कम आहे असे सरकार म्हणत नाही.
 
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे, शेतकऱ्यांच्या लुटीचा सत्तर वर्षाचा वारसा अधिक जोमाने चालवायचा, आणि नंतर विरोधकावर राजकीय कुरघोडी करण्याच्या राजकीय उद्दिष्टाने सरकारी तिजोरीवर बिनदिक्कत डाका असा हा प्रकार आहे. यापूर्वीही असे प्रकार झाले आहेत.यातला मुख्य प्रश्न असा की ही नुकसान भरपाई आहे की अनुकंपा मदत की लूट वापसी की आणखी काही या बद्दल मागणी करणारे आणि सरकार या दोन्ही बाजूने व्याख्या, हिशेब,स्पष्टता येऊ दिली नाही. म्हटले तर कर्जमाफी, म्हटले तर सन्मान, कशाबद्दल हा पैसा हे मुद्दाम धूसर अस्पष्ट रहावे असेच व्यवहार झाले आहेत.हा एक ठराविक राजकीय उद्दीष्ट समोर ठेऊन सरकारी तिजोरीवर सरकारने घातलेला रॉबिनहुड टाइप दरोडा समजायला पाहिजे. वाइट बाब ही की यात विरोधी पक्ष सामिल आहेत आणि माध्यमांनीही स्पष्टतेपेक्षा सनसनाटी निवडली आहे. इतर प्रदेशात सुद्धा अशीच परिस्थिति आहेत. या समोर टीवी, सायकल, टॅब वाटप हे भुरटे प्रकार म्हणावे लागतील.

याबद्दल कोणी न्यायालयात गेले तर कदाचित याची वैधता तपासली जाईल. न्यायालयानेही याला मान्यता देण्याआधी स्पष्टता येेईल अशी भूमिका घेतली तरच इथे कायद्याचे राज्य आहे असे होईल.

(शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील या पोस्टर वरील आकडे सुमारे पंचेवीस वर्षापूर्वीचे आहेत. आजही वार्षिक लूट आणि एकूण कर्जाचे प्रमाण असेच आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *