SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

|| कायद्याचे राज्य यावे ||

||कायद्याचे राज्य यावे यासाठी लढणे हीच दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई असणार आहे.||agrarian_crime
*

मुंबईत सेना येणे आवश्यक आहे अशी एक धारणा आहे. तीच आपले रक्षण करू शकते अशी भाषा केली जाते. हे खरे नाही.

*

नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम सुरक्षा संस्थांचे; पोलिस, न्यायालय, सरकार यांचे. राजकिय / सामाजिक कार्यकर्त्यांचे नव्हे. हे सगळे अशक्य व्हावे अशी परिस्थिती गेल्या सत्तर वर्षात तयार झाली. गलथान शहरीकरण, खेड्यांचे बकालीकरण झाले. सोबत नोकरशाही, नेता, तस्कर, गुंड यांनी व्यवस्था ताब्यात घेतली. त्याला विरोध करून कायद्याचे राज्य यावे यासाठी लढण्या ऐवजी शिवसेनेने नोकर, नेता, तस्कर, गुंड यांचीच फौज तयार केली आणि समांतर व्यवस्था राज्यात राबवली. बाकीचे पक्षही त्याच मार्गाने गेले. भारतात सगळीकडे थोड्या फार फरकाने अशीच परिस्थिती झाली आहे. समाजवादाचा पराभव झालेल्या रशिया, आणि रशियाचे मित्र असलेल्या पूर्व युरोपातील बहुतेक देशांना हा प्रश्न भेडसावतोय.खिसा कापणारा उदार झाला आणि घरी जाण्यासाठी दहा वीस रुपये देऊन गेला अशी या राजकीय पक्ष आणि पाठिराखे यांची झाली आहे. यावर एकच उपाय आहे. अशा रॉबिन हूड छाप लोकांना विरोध करून कायद्याचे राज्य यावे यासाठी लढणे. हीच दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई असणार आहे.

*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *