SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

राखीव जागांचा प्रश्न: अर्थवादी चळवळींना धोका

nfm

शरद जोशींच्या पत्रातील निवडक उतारे.

  • दिनांक ३ ते ५ मे (१९८५) रोजी आंबेठाण येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राखीव जागांचा प्रश्न व राखीव जागांसंबंधी उभयपक्षी चळवळी यांचा तपशीलवार विचार झाला.
  • शतकानुशतके आर्थिक, सामाजिक अन्यायाखाली दबून गेलेल्या समाजांना विशेष सवलतींची आवश्यकता आहे. एकाच पिढीत आर्थिक दुर्बल बनलेले आणि पिढ्या न् पिढ्या सामाजिक अन्याय सोसलेले पण वेगवेगळ्या कारणांमुळे आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेले यांची जरी तुलना केली तरी राखीव जागांसारख्या तरतुदींची गरज दुसऱ्या गटालाच जास्त आहे यातही काही वाद नाही.
  • राखीव जागांच्या प्रश्नावर उभयपक्षी चळवळीची भाषा सुरू झाली तर स्थानिक पातळीवर दीर्घकाल खदखदणारे व्यक्तिगत रागलोभ उफाळून येतील. आणि महाराष्ट्रभर मोठा हलकल्लोळ उडण्याचा धोका तयार होईल. पिळले जाणारे अशा निमित्ताने एकमेकांची डोकी फोडू लागले तर सोय फक्त सर्वांना पिळणाऱ्यांचीच होणार आहे. अर्थवादी चळवळींना त्यामुळे मोठा धोका संभवतो.
  • शेतकरी संघटनेने राखीव जागांच्या प्रश्नावरती आंदोलने, मग ती विरोधी असोत की समर्थक असोत, गावात येऊ देणार नाही असा निर्णय घेतला (आहे).
  • संधी हुकलेली काही गवशी मंडळी अजूनही या विषयावर (राखीव जागांच्या प्रश्नावर) काही खळबळ माजवता येते का ते पहात आहेत.

मूळ पत्र येथे उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *