SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

शरद जोशींचा मार्शल प्लान

 

शरद जोशींचा मार्शल प्लान

img-20151221-wa0017

 


शरद जोशींचा मार्शल प्लान म्हणजे काय? त्यासाठी आपण काय केले पाहिजे? या प्रश्नाचा इथे अगदी थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.


शेतीत राहून किंवा शेतीबाहेर पडून काही करण्याची इच्छा असलेल्या तरुणांची कोंडी यातून सावरण्यासाठी ‘भारता’ च्या आर्थिक पुनर्रचनेची गरज आहे. त्यासाठी दुसऱ्या महायुद्धात उध्वस्त झालेल्या युरोपातील इंग्लंड, फ्रांस, इटली, जर्मनी, नेदरलंड आदि देशांसाठी जनरल मार्शल यांनी सुचवलेल्या मार्शल प्लान च्या सारखी विस्तृत योजना हाती घ्यावी लागेल अशी मांडणी शरद जोशींनी केली आहे.

ग्रामीण अर्थकारणाला सावरून गती देण्यासाठी तीन प्रमुख गोष्टीची आवश्यकता आहे. या कार्यक्रमासाठी दीर्घकालीन आर्थिक तरतूदही करावी लागेल.

१. शेतकऱ्यांच्या गळ्यातले कर्जाचे, वीजबिलाचे लोढणे काढून टाकणे कारण ही कर्जे बेकायदा व अनैतिक आहेत.

२. शेतकऱ्याचे  बाजाराचे व तंत्रज्ञाचे स्वातंत्र्य तत्काळ  पुनर्स्थापित करणे.

३. शेतीविरोधी धोरणे बदलून शेतीच्या अर्थकारणाची पुनर्रचना करणे. ज्यामुळे त्यांची भांडवल, तंत्रज्ञान, निविष्ठा, मुलभूत संरचना, बाजार आदींची गरज पूर्ण होईल.

शरद जोशींचा मार्शल प्लान मांडण्यासाठी आपल्याला तयारीचा, प्रचाराचा आणि चळवळीचा एक विस्तृत कार्यक्रम राबवायचा आहे.  आपले काम तयारीचे, प्रचाराचे आणि समर्थन मिळवण्यासाठी असणार आहे.

  • कर्जमुक्तीची, वीजबिलमुक्तीची लढाई शेतकरी संघटना दोन दशके लढतच आहे. आपल्याला नव्याने, परिणामकारक कार्यक्रम यासाठी हाती घ्यावे लागतील. (ही भाषा आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना हे पक्ष बोलू लागले आहेत. मात्र अजून त्यांना कर्जमाफी आणि कर्जमुक्ती यातला फरक लक्षात आलेला दिसत नाही).

  • सिलिंगचा कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा हे शेतकऱ्यांच्या गुलामीचे तीन प्रमुख कायदे रद्द व्हावेत यासाठी अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली किसानपुत्र आंदोलन सुरु झालेच आहे.

  • या आंदोलनात सहभागी होऊन त्यासोबतच बाजार समितीचा कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा, वन्य प्राणी संरक्षण कायदा हे तीन कायदेही शेतीविरोधी आहेत म्हणून रद्द झाले पाहिजेत यासाठी आपली शक्ती पणाला लावावी लागेल.

  • तंत्रज्ञान, विशेषतः जैविक तंत्रासाठीच्या लढाईचे आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे.

आपल्या चळवळीत या सगळ्या आंदोलनांचा, कार्यक्रमांचा काही एक निश्चित क्रम असायची आवश्यकता नाही. तसेच सगळ्यांनी सर्व आघाडयांवर लढले पाहिजे असेही नाही. मात्र या सगळ्या लढाया एका मोठ्या बदलासाठीच्या युद्धाच्या आहेत हे ध्यानात घ्यावे लागेल.

One Reply to “शरद जोशींचा मार्शल प्लान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *