SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

अशक्य ते अपरिहार्य झाले आहे

kallol

ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण केले तरच देशाची सर्वांगीण प्रगती होणार आहेng1

राजंसह प्रकाशनतर्फे वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेल्या ‘शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी  यांच्या हस्ते रविवारी पुण्यात झाले. या प्रसंगी बोलतांना त्यांनी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरली तरच देशाची प्रगती होईल, असे मत  व्यक्त केले. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान वीस टक्के इतके आहे. तर, शेतीवर आजही  पासष्ट टक्के लोकसंख्या अवलंबून आहे. आपल्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण केले तरच देशाची सर्वांगीण प्रगती होणार आहे. त्याकरिता शेतीतील उत्पादकता वाढीस प्राधान्य द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्षा आणि माजी आमदार सरोजताई काशीकर होत्या.राजहंस प्रकाशनच्या संपादिका विनया खडपेकर, पालकमंत्री गिरीश बापट, प्रसिद्ध लेखक राजीव साने या वेळी उपस्थित होते.

“व्हेअर इस दि  पोलीटिकल स्पेस फोर धिस?”

ms

अशीच परिस्थिती संघटनेने पुण्यात आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात उद्भवली  होती. या चर्चासत्रात तेंव्हाचे अर्थमंत्री मनमोहनसिंग सहभागी झाले होते. कर्जमुक्ती, जीवनावश्यक वस्तूंचा कायदा, नववे परिशिष्ट या बाबतच्या संघटनेच्या मांडणीशी त्यांनीही तत्वतः सहमती दर्शविली होती, पण जोपर्यंत या मांडणीला (व मागणीला) राजकीय महत्व येत नाही तोपर्यंत काही होणे अशक्य वाटते असेही त्यांचे मत होते. त्यांनी विचारलेला प्रश्न “व्हेअर इस दि  पोलीटिकल स्पेस फोर धिस?”असा होता.

दुर्दैवाने दलित,आदिवासी, आणि मुस्लीम मतांची मोट आपल्याला तारून नेईल अशी पारंपारिक मांडणी करणारी कॉंग्रेस, आणि  सं पु आ.  यांचे सोबत  जद आणि भाजपा यांना  ही “पोलीटिकल स्पेस” तयार होतांना दिसलीच नाही. १९६७ नंतर त्यांनी गरिबी हटाव, मंडल, मंदिर अशा रूपांनी समोर येणारे उद्रेक शमवण्याचा प्रयत्न केला.

शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न सोडवणे आता अपरिहार्य होत आहे

sj

नीती आयोगाचे काही ताजे निष्कर्ष आणि सूचना, मोदी सरकारचे शेतीचे उत्पन्न वाढवण्याचे संकल्प, नितीन गडकरी यांचे वक्तव्य काहीसी आशादायक परिस्थिती तयार होत आहे याचे संकेत देणारे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाच्या भावाचे प्रश्न, चिंता वाटावी असा शेतीच्या आर्थिक वाढीचा वेग, राजस्तान, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातील शेतकरी जातींचे उद्रेक अशी “पोलीटिकल स्पेस” तयार होते आहे याची लक्षणे आहेत. खरेतर ही “स्पेस” नाकारणाऱ्या कॉंग्रेस आणि  सं पु आ चा पाडाव आणि भाजपचा विजय हाही याच नव्या स्पेस मधून तयार झालेल्या आकांक्षांचा दणका आहे हे ओळखून पुढची पावले टाकण्याची गरज आहे.

अशक्य ते अपरिहार्य झाले आहे

नितीन गडकरी, हे सगळे कृषी आणि व्यापार मंत्रालयातील आपले सहकारी आणि नीती आयोगापर्यंत पोहोचले पाहिजे. धोरणात आले पाहजे. अंमलात आले पाहिजे. हे कठीण आहे. कधी कधी अशक्य वाटते. पण आता हे करणे अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी आपण सगळे निकराचे प्रयत्न करू या. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *