SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

जनुकीय, जैविक तंत्रज्ञान वापराचे स्वातंत्र्य

१२वे अधिवेशन

जनुकीय तंत्रज्ञान, जैविक तंत्रज्ञान यांच्या वापराच्या स्वातंत्र्या बद्दल

या आधीचे १२ वे अधिवेशन (८-१० नोव्हेंबर २०१३) चंद्रपूरला झाले होते.  गेल्या तीन वर्षात झालेल्या घडामोडी पाहता जनुकीय तंत्रज्ञान, जैविक तंत्रज्ञान यांच्या वापराच्या स्वातंत्र्याबद्दलचे  हे ठराव आज आणखीनच महत्वाचे ठरतात. या संबंधीचे १२ व्या अधिवेशनातील ठराव असे होते.

 

ठराव

शेती व्यवसायावरील अन्न, उर्जा, पशुखाद्य, औषधी व इतर उद्योगांसाठी आवश्यक उपपदार्थ निर्माण करण्याची जबाबदारी लक्षात घेऊन,

पाणी, उर्वरके, खते, किटकनाशके, यांच्या विवेकी वापराची गरज ओळखून,

शहरांची वाढ, रस्ते, सार्वजनिक वापराचे प्रकल्प , धूप, खनिजांसाठी खणन, इत्यादी कारणांमुळे कमी होत जाणारे शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र आणि वाढती मजुरी व इतर उपनिविशांचा खर्च यात मेळ घालणे दिवसेंदिवस शेतीची लूट वाढवीत आहेत.

या परिस्थितीतही शेती टिकवण्यासाठी व शेतीवरील उत्पादकतेचे तसेच रोजगार व ग्रामीण क्रयशक्तीचे स्रोत जोपासण्यासाठी उपलब्ध त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे हे ओळखून,

शेतकरी संघटनेचे हे १२वे अधिवेशन शेती तंत्रज्ञान, विशेषतः जनुकीय तंत्रज्ञान व जनुकीय तंत्रज्ञान भारतातील ग्रामीण व शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेच्या कार्यक्रमातील एक अविभाज्य भाग मानते आणि अशी मागणी करते की जनुकीय, जैविक  व अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे.

कापसातील बीटी तंत्रज्ञांनासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या गौरवशाली लढाईची आठवण करून देऊन या पुढेही जैविक तंत्रज्ञान, जनुकीय तंत्रज्ञान व इतर तत्सम आयुधांचा वापर करण्याचे आपले स्वातंत्र्य व अधिकार मानते.

या तंत्रज्ञानाच्या वापरात येणाऱ्या विविध निर्बंधांचा तसेच सुरक्षेची अवास्तव भीती दाखवून हे तंत्रज्ञान वापरासाठी खुले करण्यात दिरंगाई होत आहे याचा निषेध करून शासनाचा धिक्कार करीत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *