SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

अस्वस्थ इंडिया, उध्वस्त भारत आणि परेशान दुनिया

आपण स्वीकारलेल्या निवडणुकीच्या  पद्धतीमुळे सगळ्यात जास्त मते पडणारा उमेदवार निवडून येतो. त्यामुळे गेली साठ-सत्तर वर्षे भारतभर शेतीउद्योगातील जातीचे पाठबळ घेऊन राजकीय नेतृत्व उभे राहिले. परंतु केंद्रात राजकीय प्रभुत्व मात्र कॉंग्रेसचा वारसा चालवणाऱ्या नेहरू घराण्याचे, आणि त्यांचेबरोबर राज मान्यतेची परंपरा असलेल्या ल्युटीयन दरबारचे राहिले. त्यांनी राबावलेली देशाची धोरणे इंग्रजी वसाहती प्रमाणेच राहिली. प्रांतीय सरकारांची अवस्था मांडलिक संस्थानांसारखी राहिली. त्यामुळे देशातील धोरणे ठरवण्याऱ्या मंडळीचे  फावले. त्यात समाजवादी, लोकशाही समाजवादी, डावे-उजवे कम्युनिस्ट या समूहवाद्यांचा प्रभाव आजपर्यंत कायम आहे. संपत्तीचे, साधनांचे पुनर्वाटप, त्यातून समता येईल ही कल्पना. मग त्यासाठी माणसाच्या स्वातंत्र्याचा बळी गेला तरी चालेल अशी त्यांची भूमिका. त्यातूनच घटनेचे नववे परिशिष्ट आले. सिलिंग आले. जीवनावश्यक वस्तू कायदा आला.APMC आली. आयात निर्यात धोरणावरचे नियंत्रण आले. कामगार कायदे आले.जमीन अधिग्रहण आले. लेवी आली. किमान वेतन कायदा आला.लायसन परमिट इन्स्पेक्टर राज्य आले. या सगळ्यांचे कथित हेतू काहीही असोत, परिणाम कायम शेतीविरोधी राहिले. सत्तर वर्षात प्रमुख्याने ग्रामीण भागाची, शेतीची अवस्था वाईट झाली. खेडी बकाल झाली. भारत उध्वस्त झाला.देशभर  त्या त्या भागात मोठी लोकसंख्या असलेल्या जाती शेती व्यवसायात आहेत. राजकीय नेतृत्व त्यांच्या जातीच्या माणसांकडे. सत्ता त्याच्याकडे. असे असूनही त्यांची अवस्था पराकोटीची.  इंडियाही अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता कॉंग्रेसच्या पराभवास कारण ठरली आहे. मोदी भाजपा आल्यामुळे फरक पडेल असे वाटले होते. पण तेही  धोरणे बदलायला तयार नाहीत.समूहांच्या, समूहावाद्यांच्या दबावाला तोंड देण्याची हिम्मत तेही करत नाहीयेत.

यात बदल घडवायचा असेल तर धोरण बदलावे लागेल. माणसाचे स्वातंत्र्य महत्वाचे. त्याचा संकोच झाला तर स्वातंत्र्य तर जातेच, समता समृद्धीचीही शक्यता नष्ट होते हे सिद्ध झाले आहे. मिलटन फ्राईडमन यांनी याचे भाकीत फार आधीच केले होते. जगातील समाजवादाच्या पाडावानंतर गोर्बाचेव यांनी रशियात, आणि रशियाला आदर्श  मानणाऱ्या सगळ्या देशांनी १९८० नंतर आपली धोरणे बदलली. त्यांनी व्यक्तीच्या स्वातंत्र्याची पुनर्स्थापना केली. समाजवादी धोरणांना तिलांजली दिली. नवे आर्थिक धोरण, खुली व्यवस्था स्वीकारली. अडचणीतून बाहेर पडण्याचे धारिष्ट्य केले. बदल घडताहेत. दुनिया परेशान आहे.पण त्यांनी एक नवा मार्ग स्वीकारला आहे.

मानवत येथे शारदोत्सव व्याख्यानमालेत दोन वर्षांपूर्वी मला या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. याच  विषयावरील ही नोंद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *