SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

शेतकरी भावांनो आणि माय बहिणींनो

संघटकचा हा अंक सादर करतांना खूप आनंद होत आहे.

हा अंक बघायला शरद जोशी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात निघणारा हा अंक आणि त्यानंतरचे पुढील अंक शेतकरी संघटनेच्या पुढील वाटचालीत संघटनेच्या पाईकांना मोलाचे  ठरावेत  असा आपण प्रयत्न करू या. या कामात आपला सगळ्यांचा सहभाग आणि सहयोग मिळेल अशी आशा आहे.

आपण सगळे, विशेषत: शरद जोशींच्या सोबत पहिल्यापासून असलेले कार्यकर्ते  संघटनेत तीस वर्षाहून जास्त काळ काम करीत आहोत. या काळात आम्हाला पुनःपुन्हा संघटनेच्या तीन सुत्रांची प्रचीती आली आहे.

  • १. आमच्या  गरिबीचे कारण सरकारचे धोरण आहे.
  • २. सूट सबसिडीचे नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम.
  • ३.शेतमालाला रास्त भाव ही आमची एककलमी मागणी आहे. 

आपण यापासून विचलित होणार नाही याबद्दल जागरूक राहून आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे.

  • सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार यही समस्या है
  • शेतकरी तितुका एक एक  आणि
  • शेतकरी संघटनेचा विजय असो

या आमच्या घोषणा आहेत.

cropped-aurangabad-adhi-391.jpg

आ. शरद जोशींच्या स्मृतीला वंदन करून आणि आपल्या माय बहिणींच्या स्वप्नाची आठवण करून हे प्रास्तविक संपवत आहे.

||  इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे ||

मानवेंद्र काचोळे 

९ ऑक्टोबर २०१६, औरंगाबाद.

post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *