SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

सत्तर वर्षात भारताला उध्वस्त करणारी व्यवस्था तयार झाली आहे.

|| उध्वस्त भारत || 3 ||

 

बेगडी, भ्रष्ट, अकार्यक्षम लोकशाही, काही कुटुंबात बंदिस्त झालेले उथळ नेतृत्व, कुचकामी शिक्षण, बेरोजगारी, बेगुमान सरकारी यंत्रणा, सडलेली कायदा व्यवस्थाआणि प्रभाव नसलेली न्याय यंत्रणा, यात पिचलेली अडाणी जनता, असा उध्वस्त झालेला भारत.

हे या मोर्चामागील वास्तव.

अस्वस्थता स्फोटक आहे.सत्तर वर्षात भारताला उध्वस्त करणारी व्यवस्था तयार झाली आहे.

याबद्दल माध्यमे, विचारवंत, नेते, राजकारणी, पोथी-पंडित गांभीर्याने काही करत नाहीत. अभ्यास नाही. मांडणी नाही. आजवर स्वीकारलेल्या धोरणांची चिकित्सा नाही. बदल, उपाययोजना यांचा आग्रह नाही. आपल्या लोकशाहीत असे का घडते याची मीमांसा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *