SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

आरक्षण हे रेल्वेच्या बंद डब्याच्या खिडकी सारखे

|| उध्वस्त भारत || २ ||

एकदा आपले सरळ मार्गाने सुखाने जगण्याचे, समृद्धीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत असे लक्षात आले  की माणसाचे जगण्याचे ,समृद्धीचे मार्ग  शोधण्याचे प्रयत्न सुरु होतात. आजूबाजूला कोणत्याही कारणाने कुणाला परिस्थितून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागला की तो मार्ग आपल्यालाही खुला व्हावा असे  वाटू लागते. असे वाटणे सहाजिक आहे. आरक्षणाचेही काहीसे असेच झाले आहे.

आरक्षण मिळाल्याने त्या त्या समाजाचे किती प्रश्न सुटले हा मुद्दा वेगळा. पण  एक मानसिकता तयार झाली हे खरे.

आता आरक्षण हे रेल्वेच्या बंद डब्याच्या खिडकी सारखे झाले आहे. कसेही करून खिडकीतुन का होईना, आत जाता यावे. आत गेल्यास उभे तरी राहता यावे. उभे राहिल्यास बसायला जागा मिळावी. बसायला मिळाल्यास ऐसपैस मिळावी. ऐसपैस मिळाल्यास झोपायला मिळावे. मात्र यानंतर आत येणारा आपल्या भाग्यात वाटेकरी होऊ पाहतो. त्यांच्यामुळे डब्यातील आपल्या वाढत्या अपेक्षा धोक्यात येतात. म्हणून नवे कोणी आत येऊ नये यासाठी झगडे.

म्हणून ग्रामीण भारतातून बाहेर पडू पाहणाऱ्या जातीजमाती आपसात त्वेषाने भांडताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *