SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

उध्वस्त भारत: एक वास्तव

|| उध्वस्त भारत || १ ||

गेल्या सत्तर वर्षात शेती व्यवसायावर झालेल्या अत्याचाराचा हा परिणाम आहे.

गुर्जर, जाट, पटेल आणि आता मराठा. या शेतकरी जातींचे आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कारू, नारू जातीसमुदायांचे खरे प्रश्न आर्थिक. भू-दास जमिनीला जखडून राहिले. त्यात गुर्जर, जाट, पटेल आणि मराठा यांची संख्या जास्त. बाकीचे सगळे एक तर तिथेच. त्यापैकी ज्यांना खेडी आणि पारंपारिक व्यवसाय सोडता आले ते लवकर सुटले. यातून सुटकेचा एक मार्ग म्हणजे सरकारी नौकरी. जे जे या मार्गाने गेले त्यांचे घोडे गंगेत न्हाले. या व्यवस्थेतून बाहेर पडू पाहणाऱ्यांना म्हणूनच आरक्षण आकर्षक वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *