SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

न्याय एका माणसाने मागितला तरी मिळणारी व्यवस्था असावी लागते. शिवाजीचे प्रयत्न विशेष.

एकत्र येऊन, समूहाच्या ताकदीवर लोकांवर आपले म्हणणे मान्य करायला लावणे ही रानटी पद्धतच सगळीकडे बघायला मिळते. म्हणून मग लोक जमेल त्या मार्गाने टोळकी तयार करतात. टोळकी फक्त चोरी, लूट, दहशत करू शकतात. न्याय एका माणसाने मागितला तरी मिळणारी व्यवस्था असावी लागते. अनेक राजांनी ती उभारण्याची व्यवस्था केली. शिवाजीचे प्रयत्न विशेष. शिवाजीच्या राज्यात कोणी मनमानी करू लागला तर फाटका माणूसही म्हणायचा ” मोगलाई आहे काय?” इंग्रजांनीही इथे अशी व्यवस्था यावी असे प्रयत्न केले.. 
या देशात शेतकरी सर्व जातीचे, धर्माचे, भाषेचे, प्रदेशाचे आहेत. व्यवसाय या नात्याने “शेतकरी तितुका एक एक” अशी जाणीव शेतकरी संघटनेने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या या लढाईत डाव्यांनी, समाजवाद्यांनी नेहमी छोटा शेतकरी-मोठा शेतकरी किंवा शेतकरी-शेतमजूर असा भेद करण्याचा प्रयत्न केला. विषयांतर केले, बुद्धिभेद केला. या पलीकडे जावून संघटनेने या प्रश्नाची अर्थवादी मांडणी केली. त्याचे सार या उपाययोजनेत आहे. ती बारकाईने समजून घेतली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *